२ करिंथ 12:6-7
२ करिंथ 12:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपण अभिमान मिरवावा अशी जरी मी इच्छा धरली, तरी मी मूढ होणार नाही, कारण मी जे खरे ते बोलेन; पण मी स्वतःस आवरले पाहिजे, म्हणजे कोणी जे माझे पाहतो किंवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये. आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.
२ करिंथ 12:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी प्रौढी मिरवावी असे ठरविले तर तसे केल्याने मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी सत्य बोलत आहे, परंतु मी तसे करणार नाही. कारण मी करतो व बोलतो त्यापेक्षा कोणीही मला जास्त मानू नये, अशी माझी इच्छा आहे. मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला.
२ करिंथ 12:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही; मी खरे तेच बोलेन; तथापि मी बोलत नाही; कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.
२ करिंथ 12:6-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जरी मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली, तरी मी मूढ ठरणार नाही. मी खरे तेच बोलेन. तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी फुगून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे सैतानाचा एक हस्तक माझ्यावर प्रहार करण्याकरिता ठेवण्यात आला होता.