२ करिंथ 10:4-6
२ करिंथ 10:4-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञापालनांत पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
२ करिंथ 10:4-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे. आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो. तुमचे आज्ञापालन पूर्ण झाल्यावर, जे आज्ञा न पाळणारे आहेत आम्ही त्यांना दंड करण्यास तयार आहोत.
२ करिंथ 10:4-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो; आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
२ करिंथ 10:4-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवाच्या सामर्थ्यशाली शस्त्रांनी तटबंदी जमीनदोस्त करण्यास आम्ही समर्थ आहोत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्व अडसर पाडून टाकून प्रत्येक कल्पना बंदिस्त करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल, तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध असू.