YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 7:11-16

२ इतिहास 7:11-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या. नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, “शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे. कधी जर पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा माझ्या लोकांमध्ये रोगाराईचा प्रसार केला आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन. आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत. हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे माझे नाव येथे सदासर्वकाळ रहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल.

सामायिक करा
२ इतिहास 7 वाचा

२ इतिहास 7:11-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शलोमोनाने याहवेहचे मंदिर आणि राजमहालाचे काम संपविले आणि याहवेहच्या मंदिरात व आपल्या राजवाड्यात जे काही करावे असे त्याचे मनोरथ होते ते सर्व करण्यात तो यशस्वी झाला. रात्रीच्या वेळेस याहवेहने शलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी स्वतःकरिता हे ठिकाण यज्ञांसाठी मंदिर म्हणून निवडले आहे. “जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन, जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन. आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील. मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.

सामायिक करा
२ इतिहास 7 वाचा

२ इतिहास 7:11-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या प्रकारे शलमोनाने परमेश्वराचे मंदिर व राजमंदिर बांधण्याचे संपवले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करायचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे सिद्धीस नेले. परमेश्वर शलमोनाला रात्री दर्शन देऊन म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्यासाठी निवडले आहे. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाशकपाटे बंद केली, किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठवली, किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली, तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गांपासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. जी प्रार्थना ह्या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. ह्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे; माझे नेत्र व माझे मन हे येथे सतत लागलेले राहील.

सामायिक करा
२ इतिहास 7 वाचा