२ इतिहास 36:22-23
२ इतिहास 36:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोरेश पारसाचा राजा असताना पहिल्याच वर्षी परमेश्वराने त्यास एक फर्मान काढायला प्रेरणा दिली. यिर्मयाच्या तोंडून वदवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येण्यासाठी परमेश्वराने त्यालाही स्फूर्ती दिली. कोरेशने आपल्या दूताकरवी राज्यभर असा संदेश पाठवला की, “पारसचा राजा कोरेश म्हणतो; स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यहूदातील यरूशलेमेमध्ये मंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरूशलेमेला जाऊ शकता, परमेश्वर देव तुमच्याबरोबर असो.”
२ इतिहास 36:22-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यिर्मयाहने सांगितलेला याहवेहचा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून पर्शियाचा राजा कोरेशच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी पुढील जाहीरनामा लिहून आपल्या संपूर्ण साम्राज्यात पाठवावा अशी इच्छा याहवेहने राजाच्या मनात निर्माण केली. “पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे. तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहात तुम्ही तिथे वर जाऊ शकता आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.’ ”
२ इतिहास 36:22-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या मनास त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फर्मान पाठवले की, “पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत व मला आज्ञा केली आहे की यहूदातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध. तर तुमच्यापैकी त्याच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो. त्याने तेथे जावे.”