२ इतिहास 22:9
२ इतिहास 22:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या मनुष्यांनी त्यास तो शोमरोनात लपायच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्यास ठार केले आणि त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटाचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वरास शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.
२ इतिहास 22:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यानंतर तो अहज्याहचा शोध घेत गेला आणि त्याच्या माणसांनी त्याला पकडले तेव्हा तो शोमरोनमध्ये लपला होता, त्याला येहूकडे आणण्यात आले आणि ठार मारण्यात आले. त्यांनी त्याला पुरले, कारण ते म्हणाले, “तो यहोशाफाटचा पुत्र होता, ज्याने त्याच्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचा सल्ला घेतला होता.” त्यामुळे अहज्याहच्या घरात राज्य टिकवून ठेवण्याइतके सामर्थ्य कोणातही नव्हते.
२ इतिहास 22:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने अहज्याचा शोध लावला; त्याला त्याच्या लोकांनी पकडले; तो शोमरोन येथे लपून राहिला होता; त्यांनी त्याला येहूकडे नेऊन त्याचा वध केला. त्याला मूठमाती दिली; ते म्हणाले, “जो यहोशाफाट परमेश्वराला जिवेभावे शरण गेला त्याचा हा पुत्र.” अहज्याच्या घराण्यात राज्य करण्यास समर्थ असा कोणी उरला नाही.