२ इतिहास 1:11-12
२ इतिहास 1:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा परमेश्वर देव शलमोनाला म्हणाला, “हे तुझ्या मनात होते, आणि तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा सन्मान यांची मागणी केली नाहीस तसेच तुझा द्वेष करणाऱ्या शत्रूंचाही नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस, तसेच स्वत:साठी दीर्घायुष्य मागितले नाहीस तर ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेवर राज्य करता यावे म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस; आता तुला ज्ञान व बुद्धी देण्यात आली आहेत; तुझ्या पुर्वीच्या कोणाही राजाला मिळाले नाही व तुझ्यानंतर कोणत्याही राजाला मिळाले नाही एवढे ऐश्वर्य, संपत्ती व बहुमान मी तुला देईन.”
२ इतिहास 1:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा परमेश्वर शलोमोनाला म्हणाले, “जर हीच तुझ्या मनातील इच्छा आहे व तू धनदौलत, संपत्ती किंवा मान सन्मान मागितला नाहीस. मी तुझ्या शत्रूंना मृत्यू द्यावा अथवा स्वतःसाठी मोठे आयुष्यमान ही मागणी देखील केली नाहीस, तर ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा बनविले त्यांच्यावर नीट शासन करता यावे म्हणून तू सुज्ञता व ज्ञान मागितलेस, तुला सुज्ञता व ज्ञान देण्यात येईल. याशिवाय मी तुला इतकी धन, संपत्ती आणि सन्मान देईन की, आतापर्यंत कोणत्याही राजाला कधीही प्राप्त झाले नव्हते व कोणालाही होणार नाही.”
२ इतिहास 1:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देव शलमोनाला म्हणाला, “ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य हे मागितले नाहीस, आपल्या वैर्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाहीस, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करण्यासाठी चातुर्य व ज्ञान एवढेच तू स्वत:साठी मागितलेस, त्या अर्थी चातुर्य व ज्ञान हे तर तुला देतोच; ह्यांखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजाला प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणालाही कधी प्राप्त व्हायची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन.”