1 तीमथ्य 4:6-10
1 तीमथ्य 4:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर. कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे. हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे. याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
1 तीमथ्य 4:6-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील. मूर्ख कल्पना, खुळ्या लोककथा यापासून दूर राहा आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रशिक्षण घे. शारीरिक व्यायाम योग्य आहे, परंतु आध्यात्मिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे, कारण हे सद्य जीवनाचे आणि भावी जीवनाचे अभिवचन देते. ही गोष्ट विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.
1 तीमथ्य 4:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर; कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणार्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
1 तीमथ्य 4:6-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. परंतु अमंगळ दंतकथांपासून व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि भक्तीविषयी प्रयत्नशील राहा. शारीरिक कसरत काही प्रमाणात उपयोगी आहे. परंतु आध्यात्मिक साधना सर्व बाबतींत उपयोगी आहे; कारण ती आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन देत असते. हे वचन खातरीलायक व पूर्णपणे स्वीकारण्याजोगे आहे. आम्ही झगडतो व श्रम करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा, तारणारा आहे, त्या जिवंत देवाची आम्ही वाट पाहत आहोत.