1 तीमथ्य 4:1-5
1 तीमथ्य 4:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील. ते लोकांस लग्न करण्यास मना करतील व जे अन्न विश्वास ठेवणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील. तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही. कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
1 तीमथ्य 4:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील. ज्या लबाड बोलणार्या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली आहे. हे लोक विवाह करण्यास मनाई करतील, जे अन्न विश्वासणार्यांनी आणि सत्य जाणणार्यांनी उपकारस्तुती करून स्वीकार करावे म्हणून परमेश्वराने निर्माण केले आहे ते वर्ज्य करावे, असे ते म्हणतील. परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले तर काहीही वर्ज्य नाही. कारण परमेश्वराचे वचन आणि मध्यस्थी प्रार्थना यांनी ती समर्पित होते.
1 तीमथ्य 4:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील; लग्न करण्यास ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी उपकारस्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यायचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावीत असे सांगतील. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे, आणि उपकारस्तुती करून घेतलेले काही वर्ज्य नाही; कारण देवाचे वचन व प्रार्थना ह्यांनी ते शुद्ध होते.
1 तीमथ्य 4:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पवित्र आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. ज्यांची सदसद्विवेकबुद्धी तप्त लोखंडाने डाग देऊन मारून टाकल्यासारखी झाली आहे, असे लबाड लोक ही खोटी शिकवणूक पसरवतात. लग्न करावयाची ते मनाई करतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी कृतज्ञतेने ज्याचा उपभोग घ्यावयाचा, असे देवाने निर्माण केलेले खाद्य वर्ज्य करावे, असे सांगतील. देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे; काहीही वर्ज्य मानू नये मात्र सर्व गोष्टींचा कृतज्ञतेने स्वीकार करावा; कारण देवाचे वचन व प्रार्थना ह्यांनी ती पवित्र होते.