YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 थेस्सल 3:1-13

1 थेस्सल 3:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

म्हणून आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनै शहरातच एकटे मागे रहावे, हे आम्हास बरे वाटले. आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा; तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हास माहीतच आहे. ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित परीक्षकाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. आता तीमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्याविषयीची शुभवर्तमान आम्हाकडे आणले; ह्यामुळे बंधूनो, आम्हास आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले; कारण जर तुम्ही प्रभूमध्ये खंबीरपणे टिकता तर आता आम्ही जिवात जीव आल्यासारखे राहतो. कारण आपल्या देवापुढे, आम्ही तुमच्याकरता, ज्या सर्व आनंदामुळे आनंद करतो त्याबद्दल आम्ही देवाला तुमच्याकरीता काय धन्यवाद देऊ शकणार? आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हास तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासांतील उणे आहे ते पूर्ण करावे. देव, आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा, आमचे तुम्हाकडे येणे कुठलीही अडचण न येता होऊ देवो; आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो; ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.

सामायिक करा
1 थेस्सल 3 वाचा

1 थेस्सल 3:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा आमच्यात त्राण उरले नाही असे वाटले तेव्हा, ॲथेन्स इथे थांबून राहणे उत्तम वाटले. ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रसार कार्य करणारा आमचा बंधू आणि परमेश्वराच्या सेवेतील सहकर्मी असलेला तीमथ्य, त्याने तुम्हाला विश्वासात बळकट व प्रोत्साहित करावे म्हणून आम्ही त्याला पाठविले आहे. यासाठी तुमच्यामधील कोणीही या परीक्षांमुळे अस्थिर होऊ नये, कारण यासाठीच आपण नेमलेले आहोत हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे. वास्तविक, आम्ही तुमच्याकडे असतानाच, आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत आलो की आपला छळ होईल आणि त्याप्रमाणे घडून आले, हे देखील तुम्हाला चांगले माहीत आहे. कारण, जेव्हा हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले, तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी विचारपूस करण्यास मी त्याला तुमच्याकडे पाठविले. कदाचित कोणत्याही मार्गाने का होईना परीक्षकाने तुम्हाला परीक्षेत पाडले असेल आणि आमचे सर्व श्रम व्यर्थ गेले असतील अशी भीती मला वाटली. तीमथ्य तुमच्याकडून नुकताच आम्हाकडे परतला असून त्याने तुमचा विश्वास आणि प्रीती याबद्दल चांगली बातमी दिली आहे आणि आमच्याबद्दल तुम्हाला गोड आठवणी आहेत व तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जसे उत्कंठित आहोत, तसेच आम्हाला भेटण्यासाठी तुम्हीही उत्कंठित आहात. त्यामुळे, बंधू आणि भगिनींनो, आमच्या सर्व दुःखात व छळात तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्याकडून आम्हाला उत्तेजन मिळाले आहे. तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे आहात म्हणून आम्ही खर्‍या अर्थाने जगतो. परमेश्वराच्या समक्षतेत जो सर्व आनंद आम्हाला तुमच्यामुळे झाला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्याबद्दल परमेश्वराचे पुरेसे आभार कसे मानावयाचे? आम्ही तुमच्यासाठी रात्र आणि दिवस फार आग्रहाने प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला लवकरच भेटावे आणि तुमच्या विश्वासामध्ये जे काही उणे असेल ते पूर्ण करावे. आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा. प्रभू असे करो की जशी आम्ही तुमच्यावर करतो तशी तुमची प्रीती वाढावी आणि एकमेकांसाठी ओसंडून वाहावी. आपले प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जणांसह येतील, त्यावेळी आपल्या परमेश्वर पित्याच्या समक्षतेत तुम्ही दोषरहित आणि पवित्र असावे, म्हणून ते तुमची मने बळकट करोत.

सामायिक करा
1 थेस्सल 3 वाचा

1 थेस्सल 3:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनैतच एकटे मागे राहावे, हे आम्हांला बरे वाटले. आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा; तो असा की, ह्या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत, हे तुम्ही स्वत: जाणून आहात. कारण आम्ही तुमच्याजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हांला सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगायची आहेत; आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे. ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्‍याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. आता तीमथ्याने तुमच्यापासून आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हांला भेटण्यास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हांला भेटण्यास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्यांविषयीचे सुवर्तमान आम्हांला कळवले; ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आपल्या सर्व अडचणींत व संकटांत तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळाले; कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असलात तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल. कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदीआनंद करत आहोत त्याबद्दल तुमच्यासंबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानावेत? आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. देव, आपला पिता हा स्वत:, व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो; आणि जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो; ह्यासाठी की, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस त्याने तुमची अंत:करणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत.

सामायिक करा
1 थेस्सल 3 वाचा

1 थेस्सल 3:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आमच्याने आणखी धीर धरवेना म्हणून अथेनैमध्येच एकटे मागे राहावे, असे आम्ही ठरविले. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानासाठी देवाचा सेवक, आपला बंधू तीमथ्य ह्याला आम्ही ह्यासाठी पाठविले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. तो असा की, ह्या छळात कोणीही विचलित होऊ नये; कारण हा छळ म्हणजे देवाच्या योजनेचाच एक भाग आहे, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. आम्ही तुमच्याजवळ होतो, तेव्हा तुम्हांला अगोदर सांगून ठेवले होते की, आपल्याला छळ सहन करावा लागणार आहे आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे. ह्यामुळे मलाही आणखी धीर धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याकरिता तीमथ्यला पाठविले. सैतानाने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ होतील अशी मला भीती वाटली. आता तीमथ्यने तुमची भेट घेतल्यानंतर आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जशी तुम्हांला भेटायची आम्हांला उत्कंठा आहे, तशी तुम्हांलादेखील आम्हांला भेटायची उत्कंठा आहे आणि तुम्ही आमची नेहमी प्रेमाने आठवण करता, ह्याविषयीचे आनंददायक वृत्त आम्हांला कळविले. ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आमच्या सर्व संकटांत व छळात तुमच्या विश्वासावरून प्रोत्साहन मिळाले; कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असला, तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल. तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदीआनंद करत आहोत, त्याबद्दल तुमच्यासंबंधाने आम्ही त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत. आम्ही रात्रंदिवस अत्यंत कळकळीने प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला प्रत्यक्ष पाहावे आणि तुमच्या विश्वासातील उणिवा दूर कराव्यात. देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो. जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो. अशा प्रकारे आपला प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र लोकांसह येईल त्या वेळेस त्याने तुम्हांला देव आपला पिता ह्याच्यापुढे पवित्रतेत परिपूर्ण होण्यासाठी सशक्त करावे.

सामायिक करा
1 थेस्सल 3 वाचा