१ शमुवेल 8:19-21
१ शमुवेल 8:19-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण लोक शमुवेलाचा शब्द ऐकायला नाकारून म्हणाले, “असे नाही! आम्हांवर राजा पाहिजेच म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हापुढे चालून आमच्या लढाया लढेल.” शमुवेलाने जेव्हा लोकांनी दिलेल्या उत्तराचे सर्व शब्द ऐकून परमेश्वरास ऐकवले
१ शमुवेल 8:19-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु लोकांनी शमुवेलाचे ऐकण्यास नकार दिला. “नाही!” ते म्हणाले, “आम्हाला आमच्यावर राजा पाहिजेच. म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आमचा राजा आमचे नेतृत्व करेल आणि आमच्यासाठी युद्ध करण्यास आमच्यापुढे जाईल.” लोक जे म्हणाले ते सर्व शमुवेलाने ऐकले व तेच त्यांनी याहवेहला सांगितले.
१ शमुवेल 8:19-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरीपण लोक शमुवेलाचे म्हणणे ऐकेनात; ते म्हणाले, “नाही, नाही! आमच्यावर राजा पाहिजेच; म्हणजे इतर सर्व राष्ट्रांसमान आम्ही होऊ; आमचा राजा आमचा न्यायनिवाडा करील व आमच्यापुढे चालून तो आमच्या लढाया लढेल.” शमुवेलाने लोकांचे हे सर्व म्हणणे ऐकून परमेश्वराच्या कानावर घातले.