१ शमुवेल 28:7-8
१ शमुवेल 28:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.” मग शौलाने वेष पालटून निराळी वस्त्रे अंगात घातली आणि तो आपणाबरोबर दोन माणसे घेऊन त्या स्त्रीकडे रात्री गेला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या भूतविद्येने मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी वर आण.”
१ शमुवेल 28:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा शौल त्याच्या सेवकांना म्हणाला, “माझ्यासाठी एक स्वामिनी शोधा की, जी मृतात्म्यांशी संपर्क करते, म्हणजे मी जाईन आणि तिला विचारेन.” ते म्हणाले, “एक स्त्री एनदोर येथे आहे.” तेव्हा शौलाने आपला वेश बदलून वेगळे कपडे घातले आणि दोन माणसे घेऊन रात्रीच्या वेळेस त्या स्त्रीकडे गेला. आणि म्हणाला, “माझ्यासाठी एक आत्म्याला विचार आणि मी ज्याचे नाव सांगतो त्याला माझ्यासाठी वर आण.”
१ शमुवेल 28:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एखादी भूतविद्याप्रवीण स्त्री शोधा म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्न विचारीन.” त्याचे चाकर त्याला म्हणाले, “पाहा, एन-दोर येथे एक भूतविद्याप्रवीण स्त्री राहत आहे.” मग शौलाने आपला वेश पालटून दुसरे कपडे घातले आणि दोन माणसे बरोबर घेऊन तो रातोरात त्या स्त्रीकडे गेला; तो तिला म्हणाला, “आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून ज्या कोणाचे मी नाव घेईन त्याला उठवून माझ्याकडे आण.”