YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 21:3-6

१ शमुवेल 21:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तर आता तुझ्या हातात काय आहे? पाच भाकरी किंवा जे काही असेल ते मला माझ्या हाती दे.” तेव्हा याजकाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “माझ्याजवळ काही सामान्य भाकर नाही तर पवित्र भाकर आहे; जर तरुणांनी आपणांस स्त्रीयांपासून दूर राखले असेल तर ती घ्यावी.” दावीदाने याजकाला उत्तर देऊन म्हटले, “खचित हे तीन दिवस झाले मी निघालो तेव्हापासून स्त्रिया आम्हापासून दूर आहेत, त्या तरुणांची पात्रे पवित्रच आहेत; हा प्रवास जरी सर्वसामान्य होता तरी, आज त्यांची शरीरे किती अधिक प्रमाणात पवित्र असतील.” मग याजकाने त्यास पवित्र भाकर दिली. कारण ताजी ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समक्षतेची भाकर परमेश्वराच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती, तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे नव्हती.

सामायिक करा
१ शमुवेल 21 वाचा

१ शमुवेल 21:3-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.” परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.” दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!” तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.

सामायिक करा
१ शमुवेल 21 वाचा

१ शमुवेल 21:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे अथवा जे काही तुझ्याजवळ असेल ते दे.” याजक दाविदाला म्हणाला, “माझ्याजवळ साधारण भाकर नाही, तर पवित्र भाकर आहे; तुझ्याबरोबरचे तरुण पुरुष मात्र स्त्रियांपासून दूर राहिलेले असले पाहिजेत.” दाविदाने याजकाला म्हटले, “आम्ही वास्तविक आज तीन दिवस स्त्रियांपासून दूरच आहो; आमचा प्रवास पवित्र कार्यासाठी नाही, तरी मी निघालो तेव्हा तरुण पुरुषांची पात्रे पवित्र होती ती आज कितीतरी जास्त असली पाहिजेत?” तेव्हा याजकाने त्याला पवित्र भाकर दिली; कारण त्या दिवशी समर्पित ऊन भाकर परमेश्वरासमोर ठेवण्यासाठी जुनी भाकर तेथून काढलेली होती; तिच्याशिवाय तेथे दुसरी भाकर नव्हती.

सामायिक करा
१ शमुवेल 21 वाचा