१ शमुवेल 10:1-6
१ शमुवेल 10:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना? आज तू माझ्याकडून गेलास म्हणजे बन्यामिनी प्रदेशाच्या सीमेवर सेल्सह येथे राहेलीच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील; ते तुला म्हणतील, तू जी गाढवे शोधायला गेला होतास ती सापडली आहेत; आणि तुझ्या पित्याने गाढवांची चिंता करायचे सोडले आहे; आता त्याला तुमचाच घोर लागला आहे; तो म्हणतो, ‘मी आपल्या पुत्रासाठी आता काय करू?”’ मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल, तेथे तीन माणसे बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील, त्यांतल्या एकाच्या हातात तीन करडे, दुसर्याच्या हातात तीन भाकरी आणि तिसर्याच्या हातात एक द्राक्षारसाचा बुधला असेल. ते तुला सलाम करतील. तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातातून घे. मग तू देवाच्या टेकडीजवळ पोहचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तू तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल. व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील.
१ शमुवेल 10:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा शमुवेलाने तेलाची कुपी घेतली, शौलाच्या डोक्यावर ओतली, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला म्हणून हे झाले की नाही? आज तू माझ्यापासून गेल्यावर राहेलीच्या कबरेजवळ बन्यामिनाच्या प्रांतात सेल्सह येथे तुला दोन माणसे भेटतील ती तुला म्हणतील की, ज्या गाढवांचा शोध करायला तू गेला होतास ती सांपडली आहेत. पाहा तुझा बाप गाढवांची काळजी सोडून, तुझी चिंता करीत आहे, तो म्हणतो, मी आपल्या मुलासाठी काय करू?” मग तेथून तू पुढे जाऊन, ताबोराच्या एलोनाजवळ पोहचशील. तेव्हा तेथे तीन करडू नेणारा एक व तीन भाकरी नेणारा एक व द्राक्षरसाची बुधली नेणारा एक अशी तीन माणसे देवाकडे बेथेलला जात असलेली तुला भेटतील. आणि ती तुला अभिवादन करून तुला दोन भाकरी देतील त्या तू त्यांच्या हातातून घेशील. त्यानंतर परमेश्वराच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तू तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार, झांज, बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील. परमेश्वराचा आत्मा जोराने तुझ्यावर येईल आणि त्यांच्याबरोबर तू भविष्यवाणी करशील, आणि तू बदलून निराळा पुरुष होशील.
१ शमुवेल 10:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर शमुवेलने जैतून तेलाची एक कुपी घेतली आणि शौलाच्या डोक्यावर ओतली, त्याचे चुंबन घेत म्हणाला, “याहवेहने तुला त्यांच्या वतनावर अधिकारी म्हणून अभिषेक केला नाही काय? आज तू माझ्याकडून गेल्यावर, बिन्यामीन प्रदेशाच्या सीमेवर सेल्सेह येथे राहेलच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील. ते तुला सांगतील, ‘ज्या गाढवांच्या शोधात तू बाहेर पडला होता ती सापडली आहेत आणि आता तुझ्या वडिलांनी त्यांच्याबद्दलचा विचार करण्याचे थांबविले आहे आणि तुझ्याबद्दल काळजी करीत आहेत. ते म्हणत आहेत मी, “माझ्या मुलाविषयी काय करावे?” ’ “नंतर तिथून पुढे जात तू ताबोराच्या मोठ्या एलावृक्षाजवळ पोहोचशील. तिथे तुला बेथेलकडे परमेश्वराची आराधना करण्यासाठी निघालेली तीन माणसे भेटतील. एकजण तीन लहान करडे, दुसरा तीन भाकरी आणि तिसरा द्राक्षारसाची एक बुधली घेऊन जात असेल. ते तुला अभिवादन करतील आणि तुला दोन भाकरी देतील, त्या तू त्यांच्याकडून स्वीकारशील. “त्यानंतर तू परमेश्वराच्या गिबियाकडे, जिथे पलिष्ट्यांची चौकी आहे तिथे जाशील. त्या नगरात जाताच, संदेष्ट्यांची एक मिरवणूक सतार, डफ, सनई आणि वीणा ही वाद्ये वाजवित उच्च स्थानावरून खाली उतरत असताना आणि भविष्यवाणी करत असताना तुला आढळतील. याहवेहचा आत्मा सामर्थ्याने तुझ्यावर येईल आणि तू त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करशील; आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा व्यक्ती होशील.