१ शमुवेल 1:7-8 - Compare All Versions
१ शमुवेल 1:7-8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारासोबत परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे. तेव्हा तिचा पती एलकाना तिला नेहमी म्हणत असे, “हन्ना तू कां रडतेस? तू का खात नाहीस? आणि तुझे मन का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?”
१ शमुवेल 1:7-8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वर्षानुवर्षे हे असेच चालू होते. जेव्हा हन्नाह याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा तिची सवत पनिन्नाह, ती रडेपर्यंत चिडवीत असे आणि मग ती काही खात नसे. तिचा पती एलकानाह तिला म्हणत असे, “हन्नाह तू का रडत आहेस? तू काही का खात नाहीस? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”
१ शमुवेल 1:7-8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत असे; तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एलकाना तिला एकदा म्हणाला, “हन्ना, तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्ज केलेस? तुझे हृदय खिन्न का? मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”