1 पेत्र 4:3-6 - Compare All Versions
1 पेत्र 4:3-6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात. अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. तरीही, देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील. कारण, याकरिता, मृतांनादेखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे.
1 पेत्र 4:3-6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण गैरयहूदी लोकांप्रमाणे व्यभिचार, कामातुरपणा, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली आणि घृणित मूर्तिपूजा करण्यात तुम्ही बराच वेळ घालविला. त्यांना आश्चर्य वाटते की तुम्ही आता त्यांच्या बेपर्वा, वाईट जीवनात सामील होत नाही आणि ते तुमची निंदा करतात. पण एवढे लक्षात ठेवा की, त्यांना त्यांचा हिशोब त्या परमेश्वराला द्यावा लागेल जे जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास सिद्ध आहेत. याच कारणासाठी शुभवार्तेचा प्रचार जे आता मृत झाले आहेत त्यांना करण्यात आला होता, यासाठी की देहामध्ये त्यांचा न्यायनिवाडा मनुष्याच्या प्रमाणानुसार व्हावा परंतु आत्म्यामध्ये त्यांनी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जिवंत राहवे.
1 पेत्र 4:3-6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात. जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील. कारण सुवार्ता मृतांनाही सांगण्यात आली होती, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यांनुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवानुसार जगावे.
1 पेत्र 4:3-6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण यहुदीतर लोकांना आवडणारी कृत्ये करण्यात, म्हणजे स्वैराचार, कामासक्ती, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व बेकायदेशीर मूर्तिपूजा ह्यांत जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या बेतालपणात सामील होत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमच्याविरुद्ध दुर्भाषण करतात. परंतु जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे, त्या न्यायाधीशाला त्यांना हिशेब द्यावा लागणार आहे. म्हणूनच शुभवर्तमान मृतांनाही सांगण्यात आले होते, ह्यासाठी की, देहात त्यांचा न्यायनिवाडा मनुष्यानुसार व्हावा, पण आत्म्यात त्यांनी देवासमोर जगावे.