1 पेत्र 3:9-11
1 पेत्र 3:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे. कारण, “जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.
1 पेत्र 3:9-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण, “जो जीवनावर प्रीती करतो आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे. त्यांनी वाईटाचा त्याग करावा आणि चांगले ते करावे; त्यांनी शांतीचा यत्न करावा व तिच्यामागे लागावे.
1 पेत्र 3:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण,“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत; त्याने वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.
1 पेत्र 3:9-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
वाइटाबद्दल वाईट, शापाबद्दल शाप असे वागू नका, तर उलट आशीर्वाद द्या, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण, जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावेत, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाइटापासून आपली जीभ व खोटारडेपणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाइटाकडे पाठ फिरवून चांगले ते करावे. त्याने शांती मिळवण्यासाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.