1 पेत्र 1:3-4
1 पेत्र 1:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे, आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे
1 पेत्र 1:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो! त्यांनी आपल्या महान दयेने आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमधून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे जिवंत आशेमध्ये आपल्याला नवीन जन्म दिला आहे. हे वतन अविनाशी असून कधीही नाश होत नाही किंवा कुजत नाही; आणि हे वतन तुमच्यासाठी स्वर्गात राखून ठेवले आहे.
1 पेत्र 1:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.
1 पेत्र 1:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! त्याच्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे त्याने आपल्याला नवजीवन दिले. हे आपले अंतःकरण जिवंत आशेने भरून टाकते. म्हणूनच आपण स्वर्गातील अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्याची प्रतीक्षा करतो.