1 पेत्र 1:24-25
1 पेत्र 1:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते. परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे.
1 पेत्र 1:24-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण, “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे सौंदर्य वनातील फुलांसारखे आहे. गवत सुकते आणि फूल कोमेजते. परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.” आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला करण्यात आला होता.
1 पेत्र 1:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे; आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते; परंतु प्रभूचे ‘वचन सर्वकाळ टिकते.”’ ‘सुवार्तेचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले’ ते हेच होय.
1 पेत्र 1:24-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, सर्व मानवजात गवतासारखी आहे आणि तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते. परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते. शुभवर्तमानाचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले, ते हेच होय.