YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 1:15-19 - Compare All Versions

1 पेत्र 1:15-19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.” आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे. कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही. निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.

सामायिक करा
1 पेत्र 1 IRVMAR

1 पेत्र 1:15-19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु ज्यांनी तुम्हाला पाचारण केले ते जसे पवित्र आहेत, तसेच तुम्हीही जे काही करता त्यांच्यामध्ये पवित्र असा. कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे, “तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे.” तुम्ही ज्यांना पिता म्हणून हाक मारता, ते प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा निःपक्षपातीपणाने न्याय करतात, म्हणून या जगात तुमचे जीवन परदेशीयांसारखे आदरयुक्त भीतीने व्यतीत करा. तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही, परंतु निष्कलंक आणि निर्दोष कोकरा, जे ख्रिस्त त्यांच्या मौल्यवान रक्ताने झाली.

सामायिक करा
1 पेत्र 1 MRCV

1 पेत्र 1:15-19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’

सामायिक करा
1 पेत्र 1 MARVBSI

1 पेत्र 1:15-19 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

उलट, तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचारणात पवित्र व्हा. असा धर्मशास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’ जो तोंडदेखला न्याय करीत नाही, तर ज्याच्यात्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात त्याचा आदर राखा. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरू जो ख्रिस्त ह्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात.

सामायिक करा
1 पेत्र 1 MACLBSI