१ राजे 9:4-5
१ राजे 9:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझे वडिल दावीद यांच्या प्रमाणेच चांगल्या मनाने व सरळतेने तू माझ्यासमोर चाललास व माझ्या आज्ञा नियम पाळल्यास, तर तुझ्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी इस्राएलाच्या राजासनावर येईल. तुझे वडिल दावीद याला मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांची सत्ता इस्राएलावरून कधीच खुटंणार नाही.
१ राजे 9:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुझ्या बाबतीत म्हणायचे तर तू आपला पिता दावीद याच्याप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे हृदयाच्या सरळतेने चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील, तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीद याला मी अभिवचन देत म्हटले होते, ‘इस्राएलच्या राजासनावर तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’
१ राजे 9:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू आपला पिता दावीद ह्याच्याप्रमाणे खर्या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील, तर इस्राएलांवरील तुझे राजासन मी कायमचे स्थापीन; तुझा पिता दावीद ह्याला मी वचन दिल्याप्रमाणे इस्राएलाच्या गादीवर बसायला तुझ्या कुळातला पुरुष खुंटायचा नाही.