YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 2:2-4

१ राजे 2:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो. आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील. तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.

सामायिक करा
१ राजे 2 वाचा

१ राजे 2:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दावीदाने म्हटले, “जगाच्या प्रथेनुसार आता माझी जाण्याची वेळ आली आहे, तर खंबीर हो आणि शुराप्रमाणे वाग. आणि याहवेह तुझे परमेश्वर काय म्हणतात त्याकडे लक्ष दे: मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे याहवेहच्या आज्ञांचे पालन कर आणि त्यांचे नियम आणि आज्ञा, त्यांचे निर्णय आणि निर्बंध पाळ. असे केल्याने जे काही तू करशील आणि जिथे कुठे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील. आणि मला दिलेले हे अभिवचन याहवेह पूर्ण करतील: ‘जर तुझे वंशज आपले जीवन यथायोग्य ठेवतील, आणि त्यांच्या सर्व हृदयाने आणि जिवाने माझ्यासमोर विश्वासूपणे चालतील, इस्राएलच्या राजासनावर बसण्यासाठी तुझा वंश खुंटणार नाही.’

सामायिक करा
१ राजे 2 वाचा

१ राजे 2:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

“मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार; तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल; आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यशःप्राप्ती होईल. आणि माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की, जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील व माझ्यासमोर सत्याने व जिवेभावे चालेल तर इस्राएलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.

सामायिक करा
१ राजे 2 वाचा