१ राजे 19:11 - Compare All Versions
१ राजे 19:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठेमोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण तेथेही परमेश्वर नव्हता.
१ राजे 19:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्यात नव्हते. त्या वार्यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते.
१ राजे 19:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्याला म्हटले, “तू येथून बाहेर निघून जा; पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा.” तेव्हा पाहा, परमेश्वर जवळून जात असताना त्याच्यासमोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत व खडक फोडत होता; पण त्या वार्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला; पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता.