१ राजे 17:11-12
१ राजे 17:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!” तेव्हा ती स्त्री म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेवू आणि मग भूकेने मरु.”
१ राजे 17:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ती पाणी आणायला जात असताना, त्याने तिला आवाज देऊन म्हटले, “आणि कृपया येताना माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडा घेऊन ये.” ती म्हणाली, “याहवेह तुझ्या जिवंत परमेश्वराची शपथ, माझ्याकडे भाकर नाही; केवळ मूठभर पीठ व कुपीत थोडे जैतुनाचे तेल आहे. मी काही काटक्या गोळा करीत आहे, म्हणजे मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी भोजन बनवीन व आम्ही ते खाऊ व मरून जाऊ.”
१ राजे 17:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, “आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये.” ती म्हणाली, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही; मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करीत आहे; मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन; ते आम्ही खाऊ आणि मग मरू.”