YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 5:13-17

1 योहान 5:13-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे. आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्यास जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही. सर्व अनीती हे पाप आहे, पण असेही पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही.

सामायिक करा
1 योहान 5 वाचा

1 योहान 5:13-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी तुम्हाला हे लिहित आहे यासाठी की, तुम्ही जे परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता त्या तुम्हाला हे माहीत असावे की, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळालेले आहे. आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात. जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे. ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. प्रत्येक चुकीचे कृत्य पाप आहे आणि असेही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही.

सामायिक करा
1 योहान 5 वाचा

1 योहान 5:13-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणार्‍या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे. (आणि तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवीत राहावे). त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल; अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्‍यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे; आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनीती पापच आहे; तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे.

सामायिक करा
1 योहान 5 वाचा

1 योहान 5:13-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला शाश्वत जीवन लाभले आहे, हे तुम्हांला कळावे म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे. त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जो आत्मविश्वास वाटतो तो ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले, तर तो आपले ऐकतो. आपण जे काही मागतो, ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून जे आपण त्याच्याजवळ मागतो, ते तो आपल्याला देतो, हेही आपल्याला ठाऊक आहे. ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल, अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करणाऱ्याला ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे, असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनीती पापच आहे, तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही, असेही पाप आहे.

सामायिक करा
1 योहान 5 वाचा

1 योहान 5:13-17

1 योहान 5:13-17 MARVBSI1 योहान 5:13-17 MARVBSI1 योहान 5:13-17 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा