1 योहान 1:8-10
1 योहान 1:8-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.
1 योहान 1:8-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर आम्ही पापविरहित आहोत, असे आपण म्हणतो, तर आम्ही स्वतःला फसवितो आणि आमच्यामध्ये सत्य नाही. जर आपण आपली पापे त्यांच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहेत, म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करतील. जर आपण म्हणतो की, आपण पाप केले नाही, तर आपण परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्यांचे वचन आपल्यामध्ये नाही.
1 योहान 1:8-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही.
1 योहान 1:8-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्यामध्ये पाप नाही, असे जर आपण म्हणतो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्यामध्ये सत्य नाही. मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण देवाला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्यामध्ये नाही.