१ करिंथ 9:25-27
१ करिंथ 9:25-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो. म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्यासारखे नाही. पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.
१ करिंथ 9:25-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो. म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही. मी एखाद्या क्रीडापटूप्रमाणे माझ्या शरीरावर ताबा मिळवितो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो, जेणेकरून इतरांना उपदेश केल्यानंतर मी स्वतःच बक्षिसास अपात्र ठरणार नाही.
१ करिंथ 9:25-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वार्यावर मुष्टिप्रहार करत नाही; तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसर्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.1
१ करिंथ 9:25-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. म्हणून मीही माझे लक्ष्य नजरेसमोर ठेवून धावतो; तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही, मी दुसऱ्यांना शर्यतीसाठी बोलावताना कदाचित मी स्वतः मात्र त्या स्पर्धेसाठी अपात्र ठरेन म्हणून मी माझ्या शरीराला कष्ट देऊन त्याला ताब्यात ठेवतो.