YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 6:1-8

१ करिंथ 6:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्याबरोबर वाद असेल, तर तो वाद पवित्र जनांपुढे जाण्याऐवजी ती व्यक्ती तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करतो? पवित्रजन जगाचा न्याय करतील हे तुम्हास माहित नाही काय? आणि जर तुमच्याकडून जगाचा न्याय होणार आहे, तर क्षुल्लक बाबींचा निर्णय करण्यास तुम्ही योग्य नाही काय? आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत, हे तुम्हास माहित नाही काय? तर या जीवनासंबंधीचा न्याय किती विशेषेकरून आम्ही करू शकणार नाही? म्हणून जर दररोजच्या जीवनासंबंधीची प्रकरणे तुम्हास निकालात काढायची असतील, तर ज्यांची मंडळीत काही गणती नाही, अशा मनुष्यांना न्याय ठरविण्यास का बसवता? तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावांचा न्यायनिवाडा करता येईल, असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय? पण या ऐवजी, भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे? तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमचीच हानी आहे, त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा तुम्ही आपली फसवणूक का होऊ देत नाही? उलट तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःच्या भावावर अन्याय करता आणि फसवता.

सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा

१ करिंथ 6:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जर तुमचा कोणाविरुद्ध वाद असल्यास, तो प्रभूच्या लोकांकडे न नेता, एखाद्या अनीतिमान न्यायाधीशाकडे नेण्याचे धैर्य कसे करता? आपण प्रभूचे लोक जगाचा न्याय करणार आहोत, हे तुम्हाला माहीत नाही काय? असे असताना, तुम्ही या क्षुल्लक गोष्टींचा आपसात न्याय करण्यास समर्थ नाही का? आपण स्वतः देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का? तर त्याच्या तुलनेत या जगाच्या गोष्टी काहीच नाहीत. जर अशा गोष्टीसंबंधी तुमच्यात वाद आहेत, तर तुमच्या मंडळीशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशांना तुम्ही न्याय करावयास कसे लावता? तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे सांगत आहे. विश्वासणार्‍यांमधील वादांचा न्याय करू शकेल असा तुमच्यामध्ये कोणीच शहाणा मनुष्य नाही का? उलट एक विश्वासी मनुष्य त्याच्या बंधुवर फिर्याद करतो आणि ती ही विश्वास न ठेवणार्‍यांपुढे! तुम्हामध्ये खटले आहेत याचा अर्थ हाच की तुमचा पूर्णपणे पराजय झालेला आहे. त्याऐवजी तुम्ही अन्याय का सहन करत नाही? स्वतःची फसवणूक का करून घेत नाही? उलट, तुम्ही स्वतःच बंधू व भगिनींची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करता!

सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा

१ करिंथ 6:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुमच्यापैकी कोणाएकाचा दुसर्‍याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमानांपुढे नेण्याचे धाडस करत आहे काय? किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हायचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हांला ठाऊक आहे ना? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच. तुम्हांला व्यावहारिक प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा आहे, तर मंडळीत जे हिशेबात नाहीत त्यांना कसे नेमता? तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुमच्यामध्ये नाही, असे आहे की काय? परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो, आणि तीही विश्वास न ठेवणार्‍यांपुढे करतो हे कसे? तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे; त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही? उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करता, आणि ती बंधुजनांची करता.

सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा

१ करिंथ 6:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुमच्यापैकी कुणाचा दुसऱ्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमान न्यायाधीशांपुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय? पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हावयाचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्‍लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत, हे तुम्हाला ठाऊक आहे ना? तर मग सर्वसामान्य गोष्टींविषयी सांगणे नकोच. तुम्हांला सर्वसामान्य प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा असतो, तेव्हा ख्रिस्तमंडळीत ज्यांना स्थान नाही त्यांना कसे नेमता? तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावाचा निवाडा करता येईल, असा एकही सुज्ञ माणूस तुमच्यांमध्ये नाही की काय? परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही विश्वास न ठेवणाऱ्यापुढे करतो, हे कसे? तुम्ही एकमेकांवर खटले भरता हे तुमच्या अपयशाचे लक्षण आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा झालेली फसवणूक का सोसून घेत नाही? उलट तुम्ही स्वतः अन्याय व फसवणूक करता आणि तीही बंधुजनांची करता!

सामायिक करा
१ करिंथ 6 वाचा