१ करिंथ 14:27-28
१ करिंथ 14:27-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर कोणी अन्य भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एकावेळी एकानेच बोलावे आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा. जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर अन्य भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, स्वतःशी व देवाशी बोलावे.
१ करिंथ 14:27-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणी अन्य भाषेत बोलतो, तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन क्रमानुसार, एकजण एकावेळी बोलेल आणि दुसरा अर्थ सांगेल. पण अर्थ सांगणारा उपस्थित नसला, तर अन्य भाषा बोलणार्यांनी मंडळीत शांत राहवे. त्याने स्वतःशी व परमेश्वराशी बोलावे.
१ करिंथ 14:27-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अन्य भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत; अधिक नसावेत व त्यांनी पाळीपाळीने बोलावे; आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वत:बरोबर व देवाबरोबर बोलावे
१ करिंथ 14:27-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अपरिचित भाषा बोलायच्या असल्यास बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत, अधिक नसावेत. त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि दुसऱ्या एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर अपरिचित भाषा बोलणाऱ्याने ख्रिस्तमंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे.