YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 13:4-8

१ करिंथ 13:4-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही. प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते. प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते. भविष्यनिवेदन करण्याचे दान समाप्त होईल, वेगवेगळी भाषा बोलण्याचे दान स्तब्ध होईल आणि बुद्धीचे ज्ञान नाहीसे होईल; परंतु प्रीती अखंडपणे टिकून राहील.

सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा

१ करिंथ 13:4-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, ती सभ्यता सोडून वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती दुष्कृत्यात आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टींत चिकाटी सोडत नाही आणि सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवते, सर्व गोष्टींत आशा बाळगते व सर्व गोष्टींत धीर कायम ठेवते. प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल

सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा

१ करिंथ 13:4-8

१ करिंथ 13:4-8 MARVBSI१ करिंथ 13:4-8 MARVBSI१ करिंथ 13:4-8 MARVBSI१ करिंथ 13:4-8 MARVBSI१ करिंथ 13:4-8 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा