१ करिंथ 12:12-14
१ करिंथ 12:12-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण शरीर ज्याप्रमाणे एक असून त्याचे अवयव पुष्कळ असतात आणि एका शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर असते त्याप्रमाणेच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच पवित्र आत्म्याने भरण्यात आले. कारण शरीर हे एक अवयव नसून पुष्कळ अवयव मिळून एक आहे.
१ करिंथ 12:12-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे. काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे. आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे.
१ करिंथ 12:12-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे.1 आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे.
१ करिंथ 12:12-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव नव्हे, तर अनेक अवयव मिळून शरीर झालेले असते.