१ करिंथ 10:19-20
१ करिंथ 10:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे? नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही.
१ करिंथ 10:19-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मूर्तींना अर्पिलेल्या अन्नास काही महत्त्व आहे किंवा मूर्तीला काही महत्त्व आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे काय? नाही! गैरयहूदी लोक परमेश्वराला यज्ञ अर्पण करीत नसून भुतांना अर्पण करतात आणि भुतांशी तुम्ही सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.
१ करिंथ 10:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही; तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ‘ते देवाला नव्हे तर भुतांना करतात’; आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.