१ करिंथ 10:13
१ करिंथ 10:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.
१ करिंथ 10:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मनुष्यमात्रावर येणार्या सर्वसाधारण परीक्षेपेक्षा वेगळी परीक्षा तुम्हावर आलेली नाही आणि परमेश्वर विश्वासू आहेत; ते तुमच्या सहनशक्तीपलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाहीत. तुम्ही ते सहन करण्यास समर्थ व्हावे म्हणून परीक्षा आली असताना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सिद्ध करतील.
१ करिंथ 10:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.
१ करिंथ 10:13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लोकांना सर्वसाधारणपणे ज्या कसोटीतून जावे लागते अशाच प्रकारची कसोटी तुमच्यावर गुदरलेली आहे. देव विश्वसनीय आहे, तो तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडे पाहणार नाही, तर ती सहन करायला तुम्हांला समर्थ करील व अशा प्रकारे कसोटीबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही दाखवील.