१ करिंथ 1:1-3 - Compare All Versions
१ करिंथ 1:1-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला, पौल आणि बंधू सोस्थनेस यांजकडून, करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस, देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून कृपा व शांती असो.
१ करिंथ 1:1-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या इच्छेने ख्रिस्त येशूंचा प्रेषित होण्यासाठी बोलविलेला पौल आणि बंधू सोस्थनेस यांच्याकडून, करिंथ येथील परमेश्वराच्या मंडळीस, जे ख्रिस्त येशूंमध्ये पवित्र केलेले व पवित्र होण्यासाठी बोलाविलेले, तसेच ख्रिस्त येशू आपले व त्यांचे प्रभू यांचे नाव घेऊन प्रत्येक ठिकाणी धावा करतात त्या सर्वांस: परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
१ करिंथ 1:1-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणार्या सर्वांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
१ करिंथ 1:1-3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यासाठी बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून: देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला लाभो.