YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 21:1-8 - Compare All Versions

१ इतिहास 21:1-8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला व त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले. दावीद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “जा बैर-शेबापासून दानापर्यंत सर्व इस्राएल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहित व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या.” यवाब म्हणाला “परमेश्वर आपले सैन्य आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक वाढवो. पण माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाही का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्राएलावर त्याने दोष का आणावा?” पण राजाचा शब्द यवाबाविरुध्द अंतिम होता, यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्राएलातून फिरला. मग यरूशलेमाला परत आला. मग यवाबाने दावीदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्राएलात अकरा लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहूदात चार लाख सत्तर हजार पुरुष होते. पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता. देवाला या कृतीमुळे वाईट वाटले म्हणून त्याने इस्राएलावर मारा केला. मग दावीद देवाला म्हणाला, “मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे.”

सामायिक करा
१ इतिहास 21 IRVMAR

१ इतिहास 21:1-8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले. म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.” परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?” तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला. योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते. या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता. परमेश्वराच्या दृष्टीमध्ये देखील ही शिरगणती वाईट होती; म्हणून त्यांनी त्याबद्दल इस्राएलला शिक्षा केली. तेव्हा दावीद परमेश्वराला म्हणाला, “असे करून मी मोठे पाप केले आहे. आता मी आपणास विनंती करतो, आपल्या सेवकाचा दोष दूर करा. मी मूर्खपण केले आहे.”

सामायिक करा
१ इतिहास 21 MRCV

१ इतिहास 21:1-8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले. दाविदाने यवाबाला व लोकांच्या सरदारांना सांगितले, “जा, बैर-शेबापासून दानापर्यंत इस्राएलाची मोजदाद करून मला कळवा म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल.” यवाब म्हणाला, “लोक कितीही असोत, परमेश्वर त्यांना शतगुणित करो; पण माझे स्वामीराज, हे सर्व स्वामींचे दास आहेत ना? माझे स्वामी हे करायला का सांगतात? इस्राएलावर दोष आणण्यासाठी त्यांनी कारण का व्हावे?” तथापि राजाज्ञेपुढे यवाबाचे काही चालले नाही, म्हणून यवाब निघून सर्व इस्राएल देशभर फिरून यरुशलेमास आला. तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी दाविदाला दिली. सर्व धारकरी पुरुष इस्राएलात अकरा लक्ष आणि यहूदात चार लक्ष सत्तर हजार भरले. त्यांच्यात लेवी व बन्यामिनी ह्यांची टीप घेतली नाही; कारण ह्या राजाज्ञेचा यवाबाला वीट आला होता. ह्या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्राएलावर मारा केला. दावीद देवाला म्हणाला, “हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर आता आपल्या सेवकाला दोषमुक्त कर; कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.”

सामायिक करा
१ इतिहास 21 MARVBSI