१ इतिहास 19:18-19
१ इतिहास 19:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले. आणि इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे जेव्हा हद्देजराच्या सर्व सेवक व राजांनी पाहिले तेव्हा त्यांनी दावीदाशी तह केला व ते त्याचे चाकर झाले. म्हणून अरामी पुन्हा अम्मोनी लोकांस मदत करण्यास घाबरले. अशा रीतीने अरामी लोक अम्मोनींना मदत करण्यास तयार नव्हते.
१ इतिहास 19:18-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु अरामी सैन्यांनी इस्राएल समोरून पळ काढला आणि दावीदाने त्यांच्यातील सात हजार रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोफख यालाही ठार केले. जेव्हा हादादेजरच्या जहागीरदारांनी पाहिले की इस्राएलपुढे त्यांचा पराभव झाला, त्यांनी दावीदाशी समेट केला व ते त्याच्या अधीन झाले. यानंतर अरामी लोक पुन्हा कधीही अम्मोन्यांना त्याच्या युद्धामध्ये मदत करण्यास तयार झाले नाही.
१ इतिहास 19:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा अरामी इस्राएलापुढून पळून गेले; त्या वेळी दाविदाने त्यांच्या सात हजार रथांवरील माणसे व चाळीस हजार पायदळ ह्यांचा संहार केला आणि त्यांचा सेनापती शोफख ह्याला ठार केले. इस्राएलापुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजराचे जे अंकित होते ते दाविदाशी तह करून त्याचे अंकित झाले; ह्यानंतर अराम्यांनी अम्मोनी लोकांना साहाय्य केले नाही.