YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 16:23-31

१ इतिहास 16:23-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा. त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहीर सांगा. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण सर्व राष्ट्रांतले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत. पण परमेश्वराने आकाश निर्माण केले. महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत. अहो लोकांच्या कुळांनो परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा. परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही. पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदित होवो; राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.”

सामायिक करा
१ इतिहास 16 वाचा

१ इतिहास 16:23-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे सर्व पृथ्वी, याहवेहस्तव स्तुतिस्तोत्रे गा, दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा. सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे. इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे. राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि हर्ष असतो. अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या. याहवेहच्या नावाला योग्य तो गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या. त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो! सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही. आकाशे हर्ष करोत, पृथ्वी उल्लास करो; त्यांनी राष्ट्रांना हे सांगावे, “याहवेह राज्य करतात!”

सामायिक करा
१ इतिहास 16 वाचा

१ इतिहास 16:23-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे सर्व पृथ्वी, परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे तेज व प्रताप ही त्याच्यापुढे आहेत; सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत. अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो; जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळत नाही. आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो, राष्ट्रांमधल्या लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो!”

सामायिक करा
१ इतिहास 16 वाचा

१ इतिहास 16:23-31

१ इतिहास 16:23-31 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा