रोमकरांस 1:18-22
रोमकरांस 1:18-22 MRCV
जे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्या सर्व अधार्मिक आणि दुष्कर्म करणार्या लोकांवर परमेश्वराचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो, परमेश्वराविषयी जे कळले पाहिजे ते त्यांना प्रकट झाले आहे; स्वतः परमेश्वरानेच त्यांना ते प्रकट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही. परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली. ते स्वतःला शहाणे समजत असताना मूर्ख बनले

