स्तोत्रसंहिता 18:16-24
स्तोत्रसंहिता 18:16-24 MRCV
वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले. माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले. माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते. त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले; त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता. याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे; माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे. कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही. त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही. मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे. याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे.

