YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 17:6-12

स्तोत्रसंहिता 17:6-12 MRCV

मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल; माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका. तुमचा आश्रय घेणार्‍यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा. तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा; मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून, जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा. त्यांचे हृदय निर्दयी आहे, त्यांच्या मुखाचे शब्द गर्विष्ठपणाचे असतात. त्यांनी माझा माग काढला व आता सर्व बाजूने मला घेरले आहे, मला धुळीस मिळविण्यासाठी त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली आहे. शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे, दबा धरून बसलेल्या उग्र सिंहाप्रमाणे ते आहेत.