YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 106:40-47

स्तोत्रसंहिता 106:40-47 MRCV

आणि म्हणून याहवेहचा क्रोध आपल्या लोकांविरुद्ध भडकला आणि त्यांना त्यांच्या वारसांची घृणा आली. त्यांनी त्यांना परराष्ट्रांच्या अधीन केले, त्यांचे शत्रू त्यांच्यावर राज्य करू लागले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना चिरडले आणि त्यांच्या शक्ती समोर त्यांना समर्पण करावे लागले. बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले, तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले. असे असतानाही परमेश्वराने त्यांच्या यातनांची दखल घेतली आणि त्यांचा आक्रोश ऐकला; त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले. त्यांना बंदिवासात नेलेल्या शत्रूंच्या मनात त्यांच्याकरिता कृपा उत्पन्न केली. हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्हाला मुक्त करा; आम्हाला राष्ट्रांतून एकवटून घ्या, जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, तुमच्या स्तवनात गौरव मानावे.