मार्क 2:14-17
मार्क 2:14-17 MRCV
येशू चालत असताना जकात नाक्यावर बसलेला अल्फीचा पुत्र लेवी त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि त्यांना अनुसरला. येशू आणि त्यांचे शिष्य लेवीच्या घरी भोजन करत असताना, त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार व पापी लोक भोजन करत होते. कारण येशूंच्या मागे आलेले पुष्कळजण तिथे होते. जेव्हा नियमशास्त्र शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूंना जकातदार व पापी लोकांबरोबर जेवत असताना पाहिले, तेव्हा त्यांनी शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतात?” हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”

