वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते. ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.” येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली. तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला? एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला. “तिच्या वाटेस जाऊ नका,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर आधी सुगंधी तेल ओतले आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.” नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला. तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
मार्क 14 वाचा
ऐका मार्क 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 14:1-11
4 दिवस
आमच्या "ईस्टर म्हणजे क्रूस" डिजिटल कॅम्पेनद्वारे ईस्टरचा खरा अर्थ अनुभवा! हा विशेष कार्यक्रम तुम्हाला लुमो ईस्टर चित्रपटांमधील प्रेरणादायी क्लिप्सद्वारे येशूची कथा एक्सप्लोर करण्यासाठी आमंत्रित करतो, ज्यामुळे वैयक्तिक चिंतन, अर्थपूर्ण संभाषणे आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन मिळते. येशूचे जीवन, सेवा आणि दुःख यावर प्रकाश टाकणारे सामग्री असलेल्या या कार्यक्रमात, ईस्टरच्या संपूर्ण काळात आशा आणि मुक्तीचा संदेश लोकांना एकत्र वाटून घेण्यासाठी अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
8 दिवस
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ