YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:19-22

मत्तय 27:19-22 MRCV

त्याचवेळी, पिलात न्यायासनावर बसला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठविला, “त्या निर्दोष माणसाच्या विरुद्ध जाऊ नका, कारण आज स्वप्नात मी त्याच्यामुळे फार दुःख भोगले आहे.” परंतु तोपर्यंत प्रमुख याजकांनी व वडील यांनी “बरब्बाला सोडा” अशी मागणी करून येशूंना जिवे मारावे म्हणून समुदायाचे मन वळविले. राज्यपालांनी विचारले, “या दोघांपैकी मी तुम्हाकरिता कोणाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे?” जमावाने उत्तर दिले, “बरब्बाला सोडावे!” “मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले. “त्याला क्रूसावर खिळा,” लोक मोठ्याने ओरडले.