YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 20:20-27

मत्तय 20:20-27 MRCV

मग जब्दीच्या पुत्रांची आई तिच्या मुलांना घेऊन येशूंकडे आली. तिने त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि त्यांच्याजवळ एक कृपादान मागितले. येशूंनी तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “तुमच्या राज्यामध्ये माझा या दोन पुत्रातील एकाला आपल्या उजवीकडे व दुसर्‍याला डावीकडे बसू द्यावे.” यावर येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे, तो तुम्ही पिऊ शकाल काय?” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तो पिऊ शकू!” “त्या प्याल्यातून तुम्ही प्याल यात शंका नाही,” येशूंनी त्यांना म्हटले, “परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तयार केल्या आहेत, त्यांनाच मिळतील.” हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना त्या दोन्ही भावांचा खूप राग आला. हे पाहून येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदी लोकांचे शासक त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने तुमचा गुलाम व्हावे.