YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 19:19-26

मत्तय 19:19-26 MRCV

तुझ्या आई आणि वडिलांचा मान राख,’ आणि ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ ” तो तरुण म्हणाला, “या सर्व मी पाळल्या आहेत. मी अजून कशात उणा आहे?” येशू म्हणाले, “तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.” पण त्या तरुणाने हे ऐकले, तेव्हा तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे! मी पुन्हा सांगतो की, श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”