“स्त्री ॠतुमती होते, तेव्हा तिने विधिनियमानुसार सात दिवस अशुद्ध राहावे. त्या काळात जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. “याकाळात ती ज्या अंथरुणावर झोपेल किंवा बैठकीवर बसेल, ती सर्व अशुद्ध होतील जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. जो कोणी तिच्या बैठकीला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. जो कोणी तिच्या अंथरुणाला किंवा बैठकीला स्पर्श करेल तो व्यक्ती सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. “याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा. “महिन्यात अनियमित वेळा किंवा मासिक पाळीच्या दिवसानंतरही जर ॠतुस्राव चालू राहिला, तर त्यामुळे मासिक पाळीच्या अशुद्धतेप्रमाणे ती या अशुद्ध स्त्रावात अशुद्धच राहील. म्हणजे, नियमित मासिक पाळी चालू असलेल्या ॠतुस्रावाच्या काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल ते अशुद्ध होईल; आणि ज्या बैठकीवर बसेल ती ही अशुद्ध होईल. जी व्यक्ती तिच्या अंथरुणाला वा बैठकीला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल. त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे आणि तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. “जेव्हा ती स्त्री तिच्या स्त्रावातून शुद्ध होईल, तेव्हा तिने शुद्ध होण्यासाठी सात दिवस मोजावे, त्यानंतर ती शुद्ध होईल. आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी; याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्याचे होमार्पण म्हणून याहवेहपुढे अर्पून तिच्या स्त्रावाच्या अशुद्धतेकरिता प्रायश्चित्त करावे. “अशाप्रकारे इस्राएली लोकांना तू अशुद्धतेपासून दूर ठेवावे. आपल्यावर मरणाचा प्रसंग ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या अशुद्धतेमुळे त्यांच्यामध्ये ज्या निवासमंडपात मी राहतो तो अशुद्ध करू नये.”
लेवीय 15 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 15:19-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ