YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 3:14-16

यहोशुआ 3:14-16 MRCV

जेव्हा यार्देन नदी पार करण्यासाठी लोकांनी आपली छावणी उठविली, तेव्हा कराराचा कोश वाहून नेणारे याजक त्यांच्या पुढे निघाले. तो हंगामाचा काळ होता व त्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर आलेला असतो. तरीही कोश वाहणारे याजक यार्देनपर्यंत पोहोचताच व त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच, वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले.

यहोशुआ 3 वाचा