त्याला छळले व जाचले, तरीही त्याने आपले मुख उघडले नाही; वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही. अत्याचार करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले. तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला? कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला; माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली. दुष्ट माणसांच्या सोबत त्याला कबर नेमून देण्यात आली, आणि श्रीमंताच्या कबरेमध्ये पुरण्यात आले, परंतु त्याने काहीही हिंसा केली नव्हती, आणि त्याच्या मुखात कोणतेही कपट नव्हते. परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती, आणि जरी त्याचे जीवन पापार्पण म्हणून अर्पण झाले, तरी तो त्याची संतती बघेल आणि त्याचा जीवनकाल लांबेल, आणि याहवेहची इच्छा त्याच्या हातून सिद्धीस जाईल. वेदना सहन केल्यानंतर, तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल; माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल, आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल.
यशायाह 53 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशायाह 53:7-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ