YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 3:6-9

उत्पत्ती 3:6-9 MRCV

जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले. पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली. सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली. परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?”

उत्पत्ती 3 वाचा