YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलातीकरांस 1:16-24

गलातीकरांस 1:16-24 MRCV

त्यांच्या पुत्राला माझ्यामध्ये प्रकट करावे; यासाठी की गैरयहूदी लोकांमध्ये मी येशूंच्या शुभवार्तेची घोषणा करावी. अशी माझी त्वरित प्रतिक्रिया होती की कोणत्याही मनुष्याचा सल्ला घेऊ नये. माझ्या आधी जे प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी मी यरुशलेमपर्यंत गेलो नाही, परंतु मी अरबस्थानात गेलो. नंतर मी दिमिष्कास परत आलो. नंतर तीन वर्षानंतर केफाची ओळख करून घेण्यासाठी मी यरुशलेमला गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याबरोबर राहिलो. प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय दुसर्‍या प्रेषितांना मी भेटलो नाही. मी परमेश्वरासमोर तुम्हाला खात्री देतो की, मी जे तुम्हाला लिहित आहे त्यामध्ये काही खोटे नाही. नंतर मी सिरिया आणि किलिकिया येथे गेलो. ख्रिस्तामध्ये असलेल्या यहूदीया येथील मंडळ्यांना त्यावेळेस माझी वैयक्तिक ओळख नव्हती. त्यांनी फक्त एवढेच ऐकले होते, “ज्या मनुष्याने पूर्वी आमचा छळ केला तो आता त्या विश्वासाचा प्रचार करीत आहे ज्याचा नाश करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.” माझ्यामुळे त्यांनी परमेश्वराचे गौरव केले.